शनिवार, १० मार्च, २०१८

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन - १० मार्च २०१८

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन - १० मार्च २०१८

* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ पंतगराव कदम वय ७३ यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. पोटविकाराने ते अनेक दिवसापासून आजारी होते.

* सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावात आठ जानेवारी १९४४ रोजी कदम यांचा जन्म झाला.  त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण सातारा जिल्ह्यातच झाले.

* दहावीपर्यंतचे शिक्षण सातारा जिल्ह्यातच झाले. दहावी उत्तीर्ण होणारे ते त्यांच्या गावातील पहिले विद्यार्थी होते. शिक्षक पदविकेसाठी ते पुण्यात गेले. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

* तेथून त्यांचा पीएचडी पर्यंतचा प्रवास सुरु झाला. ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिक्षण, उद्योग, महसूल, वन, मदत, पुनर्वसन, अशा विविध विभागांचे मंत्रिपद सांभाळले आहे.

* शिक्षण संस्था उभारण्याचे त्यांचे ध्येय होते. भरती विद्यापीठ ही देशातील नामांकित शिक्षण संस्था त्यांनी सुरु केली. या विद्यापीठ सुमारे ४ लाखाहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.