मंगळवार, २७ मार्च, २०१८

ज्येष्ठ साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचे निधन - २७ मार्च २०१८

ज्येष्ठ साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचे निधन - २७ मार्च २०१८

* ज्येष्ठ साहित्यिक, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते.

* दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या  पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले.

* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरवाची आदी पुरस्कारांनी त्यांनी सन्मानित करण्यात आले होते.

* २००९ मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉ पानतावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता. व साहित्य म्हणजे काय यांची तेवढीच जाणीवही होती.

* पानतावणे यांचे धम्मचक्र, मूल्यवेध, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे. वादळाचे वंशज, दुसऱ्या पिढीचे मनोगत, लेणी आदी साहित्य प्रकाशित झाले होते.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.