शनिवार, २४ मार्च, २०१८

केरळ राज्यातर्फे फणसाला राज्यफळाचा दर्जा बहाल - २४ मार्च २०१८

केरळ राज्यातर्फे फणसाला राज्यफळाचा दर्जा बहाल - २४ मार्च २०१८

* केरळ राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा मान बहाल केला. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

* झाडाला लागणारे सर्वात मोठे फळ अशी ओळख असलेल्या फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिलेच राज्य आहे.

* फणसाच्या उत्पादनात केरळचा देशात सहावा क्रमांक लागतो. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटीहून अधिक फणसाचे उत्पादन होते.

* देशातील २० राज्यामध्ये फणस पिकत असून, फणस उत्पादनात त्रिपुराचा क्रमांक पहिला आहे. त्याखालोखाल ओरिसा, आसाम, प बंगाल, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, ही फणसाची सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत.

* फणस उत्पादनात महाराष्ट्राचा देशात १५ वा क्रमांक लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.