मंगळवार, २० मार्च, २०१८

इराणी करंडक स्पर्धा विदर्भ क्रिकेट संघाने जिंकला - १९ मार्च २०१८

इराणी करंडक स्पर्धा विदर्भ क्रिकेट संघाने जिंकला - १९ मार्च २०१८

* प्रथमच रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघाने इराणी करंडकाच्या रूपाने स्थानिक क्रिकेट मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले. 

* नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या लढतीत विदर्भाने शेष भारतावर मात करून प्रथमच इराणी करंडकावर मात केली. 

* शेष भारताविरुद्धची लढत अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णित संपली, पण पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर विदर्भाने चषकावर नाव कोरले. 

* शेष भारताविरुद्धची लढत अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णित संपली, पण पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर विदर्भाने चषकावर नाव कोरले. 

* विदर्भातर्फे २८६ धावांची खेळी करणारा अनुभवी फलंदाज वसीम जाफर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 

* विदर्भाच्या जाफरच्या द्विशतकी खेळीव्यतिरिक्त गणेश सतीश १२० व अपूर्व वानखेडे नाबाद १५७ यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ७ बाद ८०० धावांची दमदार मजल मारली होती. 

* प्रत्युत्तरात शेष भारत संघाचा पहिला डाव ३९० धावत संपुष्टात आला. विदर्भाने पहिल्या डावात ४१० धावांची निर्णायक आघाडी घेतली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.