शुक्रवार, ९ मार्च, २०१८

वास्तूविशारद बाळकृष्ण दोशी यांना प्रित्झकर पुरस्कार जाहीर - ९ मार्च २०१८

वास्तूविशारद बाळकृष्ण दोशी यांना प्रित्झकर पुरस्कार जाहीर - ९ मार्च २०१८

* सुप्रसिद्ध वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना वास्तुविशारदातील नोबेल पुरस्कार म्हणून गणला जाणारा प्रतिष्ठेचा यंदाचा प्रित्झकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.

* येत्या मे महिन्यात टोरांटोमधील आगा खान संग्रहालयातील होणाऱ्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्कार स्वरूपात १ लाख डॉलर्स म्हणजेच ६५ लाख रुपये रोख मिळतील.

* हयात फाउंडेशनचे अध्यक्ष टॉम प्रित्झकर यांनी शिकागो येथे पुरस्काराची घोषणा करताना यंदाच्या पुरस्कारासाठी बाळकृष्ण दोशी यांची निवड झाल्याचे सांगितले आहे.

* ६० वर्षाहून अधिक काळापासून सेवा आणि योगदान देणाऱ्या वास्तुविशारद हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे.

* बाळकृष्ण दोशीनी नेहमी गंभीर स्थापत्यशास्त्र कधीही दिखाऊपणा करणारे किंवा प्रवाहांचे अनुसरण करणारे नव्हते. त्यांनी सातत्याने उद्दिष्टांचे प्रदर्शन केले आहे असे पुरस्काराच्या ज्युरींनी म्हटले आहे.

* हा प्रतिष्ठित पुरस्कार मी माझे गुरु ले कॉर्बुसर यांना अर्पण करतो. यांच्या शिकवणीमुळेच मला प्रश्नांची ओळख झाली आणि शाश्वत समग्र रहिवासासाठी स्थानिकरित्या अनुसरण केलेल्या नव्या समकालीन अभिव्यक्तीचा शोध घेण्यास मला प्रोत्साहित केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.