बुधवार, १४ मार्च, २०१८

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांचे निधन - १४ मार्च २०१८

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांचे निधन - १४ मार्च २०१८

* ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. केम्ब्रीज येथील राहत्या घरी हॉकिंग्स यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

* दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हॉकिंग्स यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे अनेकांसाठी ते एक आदर्श होते.

* विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरासंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांताना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्वपूर्ण मानले जातात.

* याशिवाय, त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशा
स्त्र हे क्लिष्ट विषय सामान्यांनाही समजावेत, यादृष्टीने लिखाण केले. त्यांचे 'ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग, आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.

* हॉकिंग्स यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग्स एनर्जी, हॉकिंग्स रेडिएशन यासह अनेक शोधासाठी ते प्रसिद्ध आहेत.

* हॉकिंग्स यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल, अँड बेबी युनिव्हर्स अँड इदर एसेज, द युनिव्हर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स जायंट्स यासारखी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

* भौतिकशास्त्राचे जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. २००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या स्ट्रिंग या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होत.

* त्यांचे वडील डॉ फ्रॅंक हॉकिंग्स हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना जन्मताच मिळाले.

* ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्राचा अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर ते केम्ब्रीजमध्ये पीएचडीसाठी गेले. विश्वाची निर्मिती कशी झाली. आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात. अशा अनेक गूढ न उकललेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

* 'मोटार न्यूरॉन डिसीज ने त्यांना ग्रासले होते. गेली अनेक वर्षे त्या आजाराशी झगडत होते. त्यांची ही जिद्द आणि प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच होता. हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन मानले जायचे.

* स्टीफन हॉकिंग्सच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये

* महाविद्यालयात त्या काळी ठराविक पद्धतीने कपडे घालण्याची प्रथा होती. पण स्टीफन यांना साचेबद्ध आयुष्य जगणं पसंद नव्हते ते नेहमीच रंगीबेरंगी कपडे घालून महाविद्यालयात यायचे.

* शाळेत असताना त्यांना 'आईन्स्टाईन' या टोपण नावाने ओळखले जायचे. शाळेत हॉकिंग्सला आईन्स्टाईन असं ओळखलं जायचं.

* शाळेत हॉकिंग्सला 'आईन्स्टाईन' असं ओळखलं जात असलं तरी काही संदर्भानुसार हॉकिंग्स यांचे शाळेतील गुण मात्र एका सरासरी विद्यार्थ्यांच्या गुणापेक्षाही कमी होते.

* प्रॉपर्टीज ऑफ एक्सपांडींग युनिव्हर्स हा त्यांचा प्रबंध गेल्यावर्षी केम्ब्रीजन ऑनलाईन प्रसिद्ध केला होता. हा प्रबंध इतका हिट ठरला की जगभरातील लाखो लोकांनी प्रकाशित होताच तो डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला. आणि केम्ब्रीजची वेबसाईड अक्षरशः क्रॅश झाली.

* वेदना असहाय्य झाल्या म्हणून आपण आप्तांसाठी ओझे आहो असे वाटू लागले किंवा आपल्याकडून आता जगाला देण्यासारखे काही उरलेले नाही याची खात्री पटली.

* तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा विचार करू अशीही इच्छा त्यांनी गेल्यावर्षी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

* शाळेत असताना आपल्या काही वर्गमित्रांच्या मदतीने त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून चक्क कम्पुटर तयार केला.

* ब्रह्मांडातल्या अनेक गूढ गोष्टीची उकल करणाऱ्या या शास्त्रज्ञाला जेव्हा एका मुलाखतीत विश्वातील सर्वात गूढ गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला होता तेव्हा स्त्री ही जगातील सर्वात गूढ गोष्ट असल्याचं मत त्यांनी मांडलं होत.

* आजारपणामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली बंद झाल्या. फक्त त्यांना एका हाताच्या काही बोटांची हालचाल करता येत होती.

* स्टीफन यांनी लहान मुलासाठी लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकासाठी साहाय्य देखील केलं. २००७ साली स्टीफन यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. त्यावेळी कित्येक वर्षांनी प्रथमच ते आपल्या व्हीलचेअरवरून उठले होते आणि हवेत तारांगण्याचा सुंदर अनुभव घेतला.

* एलियन्स असू शकतात असं मानणाऱ्या शास्त्रज्ञापैकी स्टीफन एक होते.

* स्टीफन हॉकिंग्स यांचे प्रेरणादायी विचार

* गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल.

* जरी मी हालचाल करू शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्पुटरची मदत घ्यावी लागत असली. तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे.

* नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरूक ठेवा.

* आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करू शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल!

* आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत. त्याबाबत पश्चाताप करू नये.

* दिव्यांगांना माझा सल्ला आहे. तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही. किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्मा आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका.

* आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते.

* कधीही करू शकत नाही असं काहीही नाही.

* जे आपल्या बुध्यांकाबद्दल IQ बद्दल दावा करतात. ते यशस्वी असतात.

* ब्रम्हांडपेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.