गुरुवार, ८ मार्च, २०१८

मुंबई व दिल्ली जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ - ८ मार्च २०१८

मुंबई व दिल्ली जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ - ८ मार्च २०१८

* मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रथम क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने विमानतळ सेवेच्या गुणवत्तेवरून दिलेल्या क्रमवारीनुसार हा मन मुंबई विमानतळाला मिळाला आहे.

* मुंबईसोबतच दिल्ली विमानतळानेही हा मान पटकावला आहे. मुंबई विमानतळावर दरवर्षी ४० दशलक्ष प्रवाशांचा राबता असतो. या निकषावर मुंबई व दिल्ली विमानतळाला हा मान मिळाला आहे.

* त्या खालोखाल ५ ते १५ दशलक्ष प्रवाशांना सेवा देणाऱ्या हैद्राबाद विमानतळाचा क्रमांक आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवाच्या बाबतीत, जीव्हीके एमआयएलतर्फे चालवल्या व व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी [एएसक्यू] अवॉर्ड्स २०१७ साठी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवडले असल्याचे एसीआय व्यापार संघटनेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये लाखो प्रवाशांची निवड केली आहे.

* सेवेच्या निकषांच्या पूर्ततेविषयी मुंबई विमानतळाची उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित केली आहे. एसीआयच्या जागतिक कार्यक्रमाचा अधोरेखित केली आहे.

* एसीआयच्या जागतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून, विमानतळ सुविधा, चेक-इन, सिक्युरिटी स्क्रिनींग, रेस्टोरंट, दुकाने व रेस्तरॉ यासह ३४ प्रमुख निकषाच्या आधारे प्रतिसाद घेण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.