गायक दलेर मेहंदीला २ वर्षे तुरुंगवास - १७ मार्च २०१८
* पंजाबमधील पटियाला न्यायालयाने २००३ सालच्या मानव तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवून २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
* दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंग यालाही या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सध्या दलेर पंजाब पोलिसांच्या कोठडीत आहे.
* दलेर मेहंदी आणि शमशेर सिंग यांच्यावर बेकायदेशीररित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप होता. मानवी तस्करीसंदर्भात दलेर मेहंदीवर ३१ गुन्हे आहेत.
* हे दोघे सामान्य नागरिकांना आपल्या म्युझिक ट्रुपचे सदस्य असल्याचे पाठवायचे. अवैधरित्या मानव तस्करी करण्यासाठी ते घसघशीत रक्कमही आकारायचे.
* मेहंदी बंधू १९९८ आणि १९९९ साली २ ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदेशीर १० जणांना अमेरिकेत घेऊन गेले.
* बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरून २००३ साली दलेर आणि शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघांविरोधात घोटाळ्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या.
* पटियाला पोलिसांनी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील दलेर मेहंदीच्या ऑफिसवर छापा मारून कागदपत्रे जप्त केली.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा