शनिवार, २४ मार्च, २०१८

देशातील ६२ विद्यापीठ आणि संस्थांना स्वायत्त दर्जा - २४ मार्च २०१८

देशातील ६२ विद्यापीठ आणि संस्थांना स्वायत्त दर्जा - २४ मार्च २०१८

* देशभरातल्या एकूण ६२ विद्यापीठ आणि संस्थांना आज मंगळवार स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे.

* केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालय अशी विभागणी करण्यात आली आहे. स्वायत्त देण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.

* ग्रेड १ स्वायत्तता महाविद्यालय गटातून महाराष्ट्रातली काही संस्था आणि महाविद्यालयाचाही समावेश आहे.

* स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठच आणि महाविद्यालयांना आता अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, फी यासारखे अनेक स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे.

* उच्च शैक्षणिक दर्जा राखल्याच्या निकषावर ६२ संस्थांनी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री, प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली.

* ज्यात ५ केंद्रीय विद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे.

* स्वायत्त संस्था मिळवणारी महाराष्ट्रातील महाविद्यालये किंवा काही संस्था - टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई, नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ पुणे, सिम्बोसिस इंटरनॅशनल पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, दत्ता मेघे मेडिकल इन्स्टिट्यूट वर्धा, डी वाय पाटील विद्यापीठ नवी मुंबई.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.