शनिवार, ३ मार्च, २०१८

नवज्योत कौर आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - ३ मार्च २०१८

नवज्योत कौर आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - ३ मार्च २०१८ 

* आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला अखेर सुवर्णपदकाची कमाई करण्यात यश आले. महिलांच्या ६५ किलो वजनी गटात नवजोत कौर हिने जपानच्या मियु ईमाईविरुद्ध ९-१ असा विजय मिळविला.

* कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात दोन दिवसात भारताने दोनच ब्राँझ जिंकली होती. तर आज चौथ्या दिवशी ऑलिम्पिक ब्राँझ विजेत्या ऑलिम्पिक ब्रॉन्झ विजेत्या साक्षी मलिकने ६२ किलो गटात ब्राँझ पटकाविले.

* नवजोत सहभागी झालेल्या ६५ किलो गटात स्पर्धक कमी असल्याने साखळी पद्धतीने सुरुवातीच्या फेऱ्या झाल्या होत्या.

* पहिल्याच साखळी लढतीत ती जपानच्या मियु ईमाईविरुद्ध ४-४ बरोबरीनंतर पराजीत झाली होती. पण त्यात मियुला तिने अंतिम फेरीत संधीही न देता ९-१ असा विजय मिळविला.

* नवज्योतच्या या विजयामुळे आपण जपानी महिला कुस्तीगिरांना पराजीत करू शकतो. हा विश्वासही भारतीयांना लाभला आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.