शुक्रवार, ९ मार्च, २०१८

महाराष्ट्राच्या रस्त्यांची सद्यस्थिती अहवाल - ९ मार्च २०१८

महाराष्ट्राच्या रस्त्यांची सद्यस्थिती अहवाल - ९ मार्च २०१८

* रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना सरकरकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्याची लांबी गेल्या ३ वर्षात वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्त्यव्य समोर आले आहे.

* २०१४-१५ मध्ये प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी ५०,५८५ किलोमीटर होती. २०१५-१६ मध्ये ती केवळ २५९ किलोमीटरने वाढून ५०,८४४ किमी इतकी झाली. २०१६-१७ मध्ये ५२६३७ किमी इतका आहे. रस्त्याची लांबी २०१४-१५ मध्ये ५८११५ किमी, २०१५-१६ मध्ये ५८१६६ किमी, आणि २०१७-१६ मध्ये ५८११६ किमी एवढी आहे.

* ग्रामीण रस्त्यामध्येही वाढ होऊ शकली नाही. २०१४-१५ मध्ये १,४५,८७९ किमी, २०१५-२०१६ मध्ये १,४५,८८१ किमी, तर २०१६-१७ मध्ये ग्रामीण रस्त्याची लांबी १,४५,८८१ किमी इतकी होती.

* राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण मात्र राज्यात खूप वाढले आहे. २०१४-१५ मध्ये राज्यात ४,७६६ किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. २०१५-१६ मध्ये हा आकडा ७४३८ किमी वर गेला. तर २०१६-१७ मध्ये १२,२७५ किमीवर गेला.

* त्याचवेळी २०१४-१५ मध्ये ६१६३ किमीचे प्रमुख राज्यमहामार्ग होते. तो २०१५-१६ मध्ये ५१८० किमी झाले तर २०१६-१७ मध्ये ३८६१ किमी इतके झाले. प्रमुख राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने हा आकडा कमीतकमी होत गेल्याची शक्यता आहे.

* रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मार्च २०१७ पर्यंत ८६३४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

* २०१७-१८ मध्ये डिसेंबरपर्यंत १६१४ किमी लांबीच्या रस्त्यांच्या दर्जा सुधारण्यात आला आणि त्यावर २ हजार २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.