गुरुवार, १५ मार्च, २०१८

दारिद्र्य निर्मूलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर - १५ मार्च २०१८

दारिद्र्य निर्मूलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर - १५ मार्च २०१८

* पुरोगामी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आनंददायी आणि अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. देशातील गरिबीच्या तुलनेत राज्यातील दारिद्र्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले असून महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे समाधानकारक वास्तव जागतिक बँकेच्या अहवालातून पुढे आले आहे.

* देशातील गरिबीचे प्रमाण २२ टक्के असताना महाराष्ट्राने १७% प्रमाण राखून लक्षणीय प्रगती साधली आहे. मात्र दारिद्र्य निर्मूलनाबाबत राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यापेक्षा महाराष्ट्र अजूनही पिछाडीवर आहे. असे या अहवालात म्हटले आहे.

* दारिद्र्य आणि विषमता दूर करण्याच्या आकडेवारीनुसार नजर टाकल्यास २००५ नंतर राज्याने गरिबी निर्मूलनात चांगलीच मजल गाठली आहे.

* काही आदिवासी जिल्हे आणि मराठवाड्यातील परभणी, बीड, व हिंगोली या जिल्ह्यामध्येच दारिद्र्याचे प्रमाण अपेक्षेनुसार कमी झाले नसल्याचे आढळून आले आहे.

* भारताचा मानव विकास निर्देशांक ०.४६७ तर राज्याचा ०.५७२ असा नोंदविण्यात आला आहे. राज्याचा एकूण मानव विकास निर्देशांकापेक्षा २७ जिल्ह्यांचा निर्देशांक खूपच कमी आहे.

* नंदुरबार जिल्हा ०.६०४ इतका निर्देशांक खूपच कमी आहे. नंदुरबार जिल्हा ०.६०४ इतका निर्देशांक मिळवून सर्वात पिछाडीवर आहे. संपत्तीचे केंद्रीकरण होत असल्याने काही मूठभरांच्या हाती अमाप पैसा जमा होत असून बहुसंख्य लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले जात असल्याचे दिसून आले आहे.

* भारत हा सर्वाधिक गरीब परंतु काही मोजक्याच अतिश्रीमंत ठरलेल्या व्यक्तींचा देश ठरलेला आहे. एकट्या मुंबईतील २७०० व्यक्तीकडे प्रत्येकी ६० कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे.

* २०१८ या वर्षात देशातील फक्त १% श्रीमंत व्यक्तीकडे तब्बल ७३ टक्के संपत्ती गोळा झाली आहे. गेल्या वर्षी या संपत्तीचे प्रमाण ५८% होते.

* ५०% गरीब जनतेकडे देशाच्या संपत्तीचा फक्त १% भाग असल्याचेही अहवालात नमूद आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळेच दारिद्र्याचे प्रमाण घटले असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.