गुरुवार, १५ मार्च, २०१८

टी. व्ही. दिनकरण यांचा तामिळनाडूत नवीन पक्ष स्थापन - १५ मार्च २०१८

टी. व्ही. दिनकरण यांचा तामिळनाडूत नवीन पक्ष स्थापन - १५ मार्च २०१८

* सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांच्या राजकीय पक्षानंतर तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका पक्षाचा उदय झाला आहे.

* एआयएडीएमके बंडखोर नेते टी. टी. व्ही दिनकरन यांनी मेलूरमध्ये रॅली काढून नव्या पक्षाची घोषणा केली. अम्मा मक्कल मुनेत्र कडगम [एएमएमके] असे या पक्षाचे नाव आहे. विशेष म्हणजे दिनकरन यांच्या पक्षाच्या झेंडयावर माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा फोटो आहे.

* नव्या पक्षाच्या नावाची घोषणा करण्याआधी दिनकरन यांनी जयललिता यांच्या आठवणींचा उजाळा दिला. आगामी सर्व निवडणूका नव्या पक्षाच्या नावाने एकाच झेंड्याखाली जिंकू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

* जयललिता यांच्या पक्षाने निवडणूक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मिळेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणूका कुकर या चिन्हावर लढवल्या जातील. असेही त्यांनी सांगितले.

* समर्थन देणारे १८ आमदार आणि रॅलीसाठी जमलेले हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.