बुधवार, १४ मार्च, २०१८

राज्यात ९०% डाळिंबाचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यात - १४ मार्च २०१८

राज्यात ९०% डाळिंबाचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यात - १४ मार्च २०१८

* सोलापूरच्या डाळिंबाला जागतिक मानांकन [GI] मिळाले असून आता ते जगाच्या बाजारपेठेत 'सोलापूर डाळिंब' म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. 

* राज्यात कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्यात असलेला सोलापूर जिल्हा हा आता डाळींब फळपिकांसाठी प्रसिद्ध झाला आहे. 

* सोलापूरचे हवामान हे कोरडे असून हे डाळिंब फळाच्या चवीसाठी पोषक आहे. आणि कमी पाण्यात सोलापूरचा शेतकरी डाळिंब शेती करतो. 

* सध्या मालाच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्याच्या मालाला ९० ते ५०० रुपये किलो दर मिळाला होता. याचाच अर्थ जर तुम्ही दर्जेदार उत्पादन केले तर त्यासाठी खाणाऱ्यांची व पैसे सोडणाऱ्यांची वानवा नाही. 

* विशेष म्हणजे डाळिंबाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असल्याने डाळिंबाचा प्रत्येक भाग हा उपयुक्त झाला आहे. 

* तसेच या जिल्ह्यात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र असल्यामुळे डाळिंबापासून तयार होणारे उपपदार्थ याची सतत प्रात्यक्षिते दाखवली जातात. 

* गेल्या तीन वर्षाची आकडेवारी पाहता २१ हजार टन, ४५ हजार टन आणि आता जवळपास ५० हजार टन अशी निर्यात झाली आहे. 

* देशाच्या ९०% डाळींबाचे उत्पादन महाराष्ट्रात होते, आणि राज्याच्या ९०% डाळींब उत्पादन हे सोलापूर जिल्ह्यात होते. 

* म्हणूनच याला 'सोलापूर डाळींब' असे जीआय मानांकन मिळाले आहे. तरीही एकूण उत्पादनाच्या केवळ १०% डाळिंबे निर्यातक्षम उत्पादित होतात. 

* आज प्रत्येक फळाला प्रदेशांनुसार मानांकन मिळाले आहे. पण त्याची गुणवत्ता टिकवण्यात अन निर्यातीमध्ये आगेकूच करण्यात सोलापूर डाळिंबाने आघाडी मारली आहे. 

* दर्जेदार मालाला जगात मिळणारा चांगला दर पाहता शेतकऱ्यांनाही आता दर्जेदार माल उत्पादित करण्याची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.