शुक्रवार, ९ मार्च, २०१८

महाराष्ट्रातील क्षेत्रनिहाय जीडीपीतील वाटा - ९ मार्च २०१८

महाराष्ट्रातील क्षेत्रनिहाय जीडीपीतील वाटा - ९ मार्च २०१८

* उत्पादक क्षेत्रापेक्षा तुलनेने कमी रोजगार असलेल्या सेवा क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र देशापेक्षाही जलद वेगाने वाढत आहे.

* या वेगाने उत्पादन व कृषी क्षेत्रावरही मात केल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे. कुठल्याही उद्योगातील सर्वाधिक रोजगार हा उत्पादन क्षेत्रात असतो.

* उत्पादन क्षेत्र हे कमी शिक्षितांनाही रोजगार देत असल्यानेच ते सर्वसमावेशक मानले जाते. त्या तुलनेत सेवा क्षेत्रातील रोजगार हा सहसा शिक्षित व त्यामुळेच मर्यादित असतो. अशावेळी महाराष्ट्र मात्र सेवा क्षेत्रात देशाच्याही पुढे राहिला आहे.

* राज्याच्या जीडीपीत सेवा क्षेत्रात देशाच्याही पुढे राहिला आहे. राज्याच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचा वाटा हा ५४.५ % आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा राज्याच्या जीडीपीतील वाटा फक्त १९.९ टक्के आहे.

* केवळ उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राची कामगिरी देशापेक्षा थोडी चांगली असल्याचे दिसून येते. परंतु येत्या काळात सेवा क्षेत्रच वेगाने बहरेल.

* राज्य सरकारदेखील सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्नरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन' परिषदेत व्यक्त केले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.