रविवार, ११ मार्च, २०१८

भारत फ्रान्सची अणुउर्जेसह १४ करारावर मोहोर - ११ मार्च २०१८

भारत फ्रान्सची अणुउर्जेसह १४ करारावर मोहोर - ११ मार्च २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी शनिवारी दहशतवाद संरक्षण तथा भारत क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्यावर विस्तृत चर्चा करत अणुऊर्जा व सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोपनीय माहितीच्या संरक्षनासह एकूण १४ करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

* एका संयुक्त पत्रकार परिषदेत उभयतांनी दोन्ही देशात संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात मजबूत कार्य करण्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही देशात संरक्षण व सुरक्षा उच्च तंत्रज्ञानातील सहकार्याचा प्रदीर्घ इतिहास आहे.

* दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंधावर राजकीय पक्षातही व्यापक मतैक्य आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही असले तरी आमच्या संबंधाचा आलेख कायमचा चढता राहिला.

* मोदी आणि मॅक्रोन यांच्या चर्चेनंतर उभय देशांनी सुरक्षा, अणुऊर्जा, गोपनीय माहितीचे संरक्षण, शिक्षण, पर्यावरण, शहर, विकास, रेल्वे भारत प्रशांत क्षेत्रातील सहकार्य आदी १४ करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.