गुरुवार, १ मार्च, २०१८

पी चिंदबरम यांच्या मुलाला कार्ती चिदंबरम याला अटक - १ मार्च २०१८

पी चिंदबरम यांच्या मुलाला कार्ती चिदंबरम याला अटक - १ मार्च २०१८  

* माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी सकाळी चेन्नई विमानतळावर अटक केली. ते परदेशातून परतताच त्यांना आधी ताब्यात घेण्यात आले. व नंतर अटक झाली.

* आयएनएक्स मीडिया या कंपनीस २००७ साली नियमापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळवल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी कार्ती यांनी वडिलांच्या मदतीने नियम वाकविल्याचा आरोप आहे.

* कार्ती ४६ लंडनहून चेन्नईला परतताच, त्यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या आयएनएक्स कंपनीला २००७ साली सुमारे ३०५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक मिळाली होती.

* या व्यवहाराला फॉरीन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची [एफआयबीपी] संमती मिळवून देण्यासाठी कार्ती यांनी नियम वाकविल्याचा व या कामासाठी १० लाख रुपये मिळाल्याचा आरोप आहे.

* करविषयक चौकशी टाळण्यासाठी आयएनएक्स मीडियाकडून कार्ती यांना काही रक्कम देण्यात आली होती. या प्रकरणी गेल्या वर्षी १५ मे रोजी सीबीआयने एफआयआरव्ही नोंदविला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.