मंगळवार, २० मार्च, २०१८

ब्लाडिनीर पुतीन पुन्हा रशियाचे अध्यक्ष - १८ मार्च २०१८

ब्लाडिनीर पुतीन पुन्हा रशियाचे अध्यक्ष - १८ मार्च २०१८

* रशियामध्ये १८ मार्च रोजी अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. यात रशियाचे विद्यमान अध्यक्ष ब्लाडिनीर पुतीन यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला आहे.

* पुतीन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते. परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतीन यांनी तब्बल ७३.९ टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळविला.

* तसेच त्यामुळे आता आणखी ६ वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे. पुतीन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकूमशाह असे म्हटले जाते.

* आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता. असे दावे रशियातील राजकीय तज्ञानी केले होते. असे दावे रशियातील राजकीय तज्ञानी केले होते. परंतु पुतीन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.