गुरुवार, १ मार्च, २०१८

रॉजर फेडररला या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जाहीर - १ मार्च २०१८

रॉजर फेडररला या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जाहीर - १ मार्च २०१८

* जागतिक क्रमवारीत सर्वात वयस्क खेळाडू ठरलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने मैदानाबाहेर लॉरियस पुरस्कारामध्येही आपले वर्चस्व राखले. या पुरस्कार सोहळ्यात फेडररने 'वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू' आणि वर्षातील यशस्वी पुनरागमन करणारा खेळाडू असे दोन पुरस्कार जिंकले.

* या दोन पुरस्कारामुळे लॉरियस पुरस्कारामधील पाचवा आणि सहावा पुरस्कार फेडररच्या नावावर नोंदला गेला आहे. दुखापतीवर मात करून फेडररने २०१७ मध्ये पुनरागमन करताना ऑस्ट्रेलिया ओपन, तसेच विम्ब्लडन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

* याच सोहळ्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू गौरविण्यात आले. त्याचबरोबर वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून फॉर्म्युला वन शर्यतीमधील मर्सिडीज संघाची निवड करण्यात आली.

* पुरस्कार झालेल्या भावुक झालेल्या फेडररने पुन्हा एकदा तुल्यबळ प्रतिस्पर्धी राफेल नडाल धन्यवाद दिले. फेडररने २०१७ मध्ये पुनरागमन ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत रॅफेल नदालला हरविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.