शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

राज्यात ५ ठिकाणी संरक्षण उत्पादन हबची स्थापना होणार - १६ फेब्रुवारी २०१८

राज्यात ५ ठिकाणी संरक्षण उत्पादन हबची स्थापना होणार - १६ फेब्रुवारी २०१८

* केंद्र सरकारचे मेक इन इंडिया राज्यातील औद्योगिक विकासासाठी पूरक ठरत असून त्यासाठीच पाच ठिकाणी संरक्षण हब उभारला जाईल. यासंबंधीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे.

* राज्य सरकारने संरक्षण व हवाई क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले आहे. या धोरणाचा लाभ घेत नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, व पुण्यात संरक्षण हब उभा करण्याची योजना आहे.

* सरकारने औद्योगिक क्षेत्राशी संबंधित १२ धोरणांना मंजुरी दिली. जुन्या औद्योगिक धोरणाला मुदतवाढ दिली. आता या परिषदेत होणारे ४५०० सामंजस्य करार हे या धोरणांना अनुसरूनच होतील.

* मुंबईत येणारे आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र मागील सरकारने केलेल्या हलगर्जीपणामुळे गुजरातच्या गिफ्ट सिटीत गेले. मात्र या केंद्रासाठी जागा बीकेसीमध्ये आजही राखीव आहे. त्यामुळे हे केंद्र मुंबईत आणूच असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.