बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

झुलन गोस्वामी २०० बळी घेणारी जगातील पहिली महिला गोलंदान - ७ फेब्रुवारी २०१८

झुलन गोस्वामी २०० बळी घेणारी जगातील पहिली महिला गोलंदान - ७ फेब्रुवारी २०१८

* भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज गोस्वामीने आज दक्षिण आफ्रिकेत इतिहासाची नोंद केली आहे. महिला वन - डे क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारी झुलन पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.

* भारतीय महिलांचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ३ वन सामन्यांच्या मालिकेत झुलनने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

* दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलन गोस्वामी २०० बळीसह आघाडीवर आहे.

* यानंतर ऑस्ट्रेलियाची कॅथरीन फिट्झपॅट्रिक १८० बळी आणि लिसा स्थळेकर १४६ बळीसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथा क्रमांक हा वेस्ट इंडिजच्या अनीसाच्या नावावर १४५ जमा आहेत.

* तर भारताची नितु डेव्हिड १४१ बळीसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. २०११ साली न्यूझीलँड खेळताना झुलनने ३२ धांवात ६ बळी घेतले होते.

* ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर झुलन गोस्वामीच अभिनंदन केलं आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.