बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

उद्योगवाढीसाठी राज्यात 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेचे आयोजन - १५ फेब्रुवारी २०१८

उद्योगवाढीसाठी राज्यात 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेचे आयोजन - १५ फेब्रुवारी २०१८ 

* रविवारपासून सुरु होणाऱ्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही गुंतवणूकदार परिषद ३५ लाखांचा रोजगार निर्माण करण्यास सज्ज आहे. यामध्ये पाच क्षेत्रावर 'फोकस' केला जाणार असून १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 

* गुंतवणुक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून मॅग्नेटिक महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद मुंबईत आयोजित केली आहे. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 

* या परिषदेत बड्या उद्योजकांची मांदियाळी हे या परिषदेचे वैशिष्ट्य ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे यांच्याखेरीज विदेशी उद्योजकांची उपस्थिती विशेष ठरणार आहे. 

* व्हर्जिन हायपरलूप रिचर्ड ब्रॅन्सन, इमर्सनचे एडवर्ड मॉन्सर जगप्रसिद्ध कार कंपनीचे टोनीनो लॅम्बॉरगिनी हे विशेषत्वाने उपस्थित असतील. 

* मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे उदघाटन १८ फेब्रुवारी, एकूण कालावधी - ३ दिवस, एकूण करार ४ हजार, गुंतवणूक अपेक्षित - १० लाख कोटी, रोजगार अपेक्षित ३५ लाख, अपेक्षित उद्योगक्षेत्र गुंतवणूक - वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, संरक्षण, उत्पादन, खाद्य क्षेत्र.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.