शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

संशोधन - सर्वात जुनी गुहाचित्रे निअँडरथल मानवाची - २४ फेब्रुवारी २०१८

संशोधन - सर्वात जुनी गुहाचित्रे निअँडरथल मानवाची - २४ फेब्रुवारी २०१८

* ज्ञात जगातील सर्वात जुने गुहाचित्र आधुनिक मानवाने नव्हे, तर निअँडरथल मानवाने रेखाटले असल्याचे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपले हे पूर्वज असंस्कृत नव्हते, हे सिद्ध झाले आहे.

* 'सायन्स' या नियतकालिकाने स्पेनमधील तीन ठिकाणच्या गुहाचित्रांचे उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेले विश्लेषण प्रसिद्ध झाले आहे.

* ही गुहाचित्रे जवळपास ६४ हजार वर्षांपूर्वी काढली गेली आहेत. आधुनिक मानव युरोपमध्ये येण्याच्या वीस हजार वर्षे पूर्वीचा हा कालावधी आहे. हा शोध अतिशय उत्साहवर्धक आहे.

* स्पेनमधील गुहाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर ही चित्रे ज्ञात जगातील सर्वात पुरातन असल्याचे स्पष्ट होत आहे. या चित्रांच्या कालावधीनंतर जवळपास वीस हजार वर्षांनी आधुनिक मानव आफ्रिकेतून युरोपात आला.

* गुहाचित्रांचा कालावधी ठरविण्यासाठी शाश्त्रज्ञानी अत्याधुनिक युरेनियम  थोरियम कालमापन पद्धतीचा अवलंब केला. संशोधन पथकामध्ये ब्रिटन, जर्मनी स्पेन, आणि फ्रान्समधील शास्त्रज्ञाचा समावेश होता.

* संशोधनातून गृहचित्रावरून काढलेला निष्कर्ष - निअँडरथल मानव समजुतीपेक्षा अधिक प्रगत, आधुनिक मानवाप्रमाणेच रूपकांच्या आधारे विचार करण्याची क्षमता, हिमयुगातील प्राणी, भूमितीय चिन्हे अशी गुहाचित्रेही निअँडरथल मानवानेच तयार केली असावीत.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.