बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून ब्रँड अँबेसिडरपदी अक्षय कुमारची नियुक्ती - ६ फेब्रुवारी २०१८

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून ब्रँड अँबेसिडरपदी अक्षय कुमारची नियुक्ती - ६ फेब्रुवारी २०१८

* आपल्या चित्रपटाद्वारे विविध सामाजिक विषय हाताळणारा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार लवकरच देशवासियांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे धडे जाहिरातीतून देताना दिसेल.

* केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  आज केली.

* मोटार वाहन विधेयक राज्यसभेत लटकले असले तरीही मे २०१९ पर्यंत रस्ता अपघातातील दीड लाखावर होणाऱ्या मृत्यूची संख्या निम्म्याने घटविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्या मंत्रालयामार्गफतही रस्ता सुरक्षेबाबत सध्या रेडिओ व इतर माध्यमातूनही जाहिराती केल्या जात आहेत.

* आता अक्षयकुमारसारख्या लोकप्रिय चेहऱ्याचा सहभाग असलेल्या जाहिराती रस्ता नियमांच्या पालनासाठी परिणामकारक ठरतील, असा मंत्रालयास विश्वास आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.