गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

लातूरमध्ये रेल्वेडब्याचा कारखाना होणार - १ फेब्रुवारी २०१८

लातूरमध्ये रेल्वेडब्याचा कारखाना होणार - १ फेब्रुवारी २०१८

* मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा चौथा प्रकल्प असेल. अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

* या निर्णयामुळे मराठवाड्यातील आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्द होणार आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

* देशात सध्या तीन कोच फॅक्ट्री अर्थात रेल्वेचे डबे तयार करणारे कारखाने आहेत. यापैकी सर्वात पहिला कारखाना चेन्नई जवळील पेराम्बूर येथे सुरु झाला आहे.

* त्यानंतर पंजाबमधील कपूरथळा व उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे असा कारखाना सुरु झाला. यापैकी पेराम्बूर येथे सुरु झाला. यापैकी पेराम्बूरच्या कारखान्याचे नाव 'इंटिग्रल कोच फॅक्टरी' आयएचबी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.