शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

पेप्सिकोच्या इंद्रा न्यूयी यांची आयसीसीच्या संचालकपदी नियुक्ती - ९ फेब्रुवारी २०१८

पेप्सिकोच्या इंद्रा न्यूयी यांची  आयसीसीच्या संचालकपदी नियुक्ती - ९ फेब्रुवारी २०१८

* पेपिस्कोच्या प्रमुख इंद्रा न्यूयी आता क्रिकेट विश्वात पदार्पण करत आहोत. इंद्रा नुयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेन्डन्ट डायरेक्टर [स्वतंत्र संचालक] म्हणून नियुक्ती करण्यात आली.

* या संचालक पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जून २०१७ रोजी घेण्यात आला होता.

* आयसीसीने या पदावर इंद्रा नुयी यांची निवड केली आहे. जून २०१८ मध्ये त्या पदभार स्वीकारतील. दोन वर्षासाठी त्या त्या पदावर असतील.

* इंद्रा नुयी या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला तसेच पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत. फॉर्च्युन मासिकाने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी यांचा समावेश केला आहे.

* सध्या इंद्रा नुयी या पेप्सिकोच्या सीईओ असून त्यांच्या अंतर्गत पेप्सिकोची २२ उत्पादने येतात. यात ट्रॉपिकांना, फ्रीटो-ले, पेप्सी, कोका कोला प्रमुख उत्पादने आहेत.

* [ इंद्रा नुयी यांचा परिचय ]

* इंद्रा नुयी यांचा जन्म चेन्नईत झाला असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत घेतले. यानंतर त्यांनी कोलकात्यातील आयआयएम मधून शिक्षण घेतले. आणि भारतातच करियरचा श्रीगणेशा केला.

* भारतात काही वर्ष काम केल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. १९९४ मध्ये त्या पेप्सिकोत रुजू झाल्या.

* २००४ मध्ये त्यांनी कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर २००६ मध्ये त्यांची कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी म्हणून जबाबदारी सांभालळी.

* यानंतर २००६ मध्ये त्यांची कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली. २००७ मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा पदमभूषण पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.