बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

भारतीय रेल्वेत जवळपास ९० हजार नोकऱ्या - १५ फेब्रुवारी २०१८

भारतीय रेल्वेत जवळपास ९० हजार नोकऱ्या - १५ फेब्रुवारी २०१८

* रेल्वेतील नोकरी म्हणजे सुरक्षित आणि चांगली असा समज असतो. याचा फायदा घेण्याची संधी नुकतीच चालून आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्याकडील नोकऱ्यांची माहिती जाहीर केली असून तरुणांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

* आता रेल्वेमध्ये असणाऱ्या नोकऱ्या किती असणार असा अंदाज तुम्ही लावत असाल तर आकडा एकूण तुम्ही थक्क व्हाल. जवळपास भारतीय रेल्वेने ९० हजार नोकऱ्या उपलब्द असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

* यामध्ये ६२,९०७ नोकऱ्या केवळ १० वी पास झालेल्यासाठी उपलब्द आहेत. ट्रॅक मॅनेजर, गेटमन, पॉइंट्समन, पोर्टर, हेल्पर, यासारख्या पदासाठी या जागा आहेत.

* यासाठी वय १८ ते ३१ वर्षे असून इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षाची अधिक तर अनुसूचित जातीच्या अर्जदारासाठी ही सूट ५ वर्षापर्यंत आहे. यासाठी अर्जदाराने १० वी किंवा आयटीआय किंवा एनसीटीव्हीचा कोर्स करणे आवश्यक आहे.

* लोको पायलट आणि टेक्निशियन पदासाठी २६ हजार जागा भरायच्या आहेत. ५ मार्च ही या पोस्टसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वयाची अट १८ ते २८ असेल असे सांगण्यात आले आहे.

* या पदासाठी सुरवातीला साधारण २० हजार पगार आणि इतर भत्ता मिळणार आहे. दक्षिणोत्तर रेल्वेच्या पदासाठी सांस्कृतिक कोट्याअंतर्गत भरती करण्यात येणार आहे.

* तसेच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सध्या १८९६ जागा आहेत. यामध्ये अधिकारी आणि विनाअधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.