गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

'ई-वेल बील' कायदा आजपासून देशभरात लागू - १ फेब्रुवारी २०१८

'ई-वेल बील' कायदा आजपासून देशभरात लागू - १ फेब्रुवारी २०१८

* वस्तू व सेवा जीएसटी प्रणालीअंतर्गत 'ई-वेल बील' यंत्रणेची देशव्यापी १५ दिवसांची चाचणी संपल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून ही यंत्रणा लागू झाली आहे.

* 'ई-वेल बील' यंत्रणेत वाहतूकदाराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल नेताना त्याचे बिल नेणे आवश्यक आहे. 'जीएसटीएन' पोर्टलमधून निघालेले हे बिल असेल.

* आंतरराज्य मालाची वाहतूक करताना करात एकसमानता राहावी, हा या यंत्रणेचा उद्देश आहे. ही यंत्रणा खूप आधीच कार्यंवित होणे अपेक्षित होते.

* मात्र यासाठी माहिती तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा तयार झालेली नव्हती. गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेने 'ई-वेल बील' यंत्रणेची १ फेब्रुवारीपासून अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

* आता मालवाहतूकदारांना आंतरराज्य मालाची वाहतूक करताना 'ई-वेल बील' बंधनकारक असेल. या यंत्रणेची १६ जानेवारीपासून सुरु असलेली देशव्यापी चाचणीही पूर्ण झाली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.