शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

जागतिक भ्रष्टाचार अहवाल २०१७ - २३ फेब्रुवारी २०१८

जागतिक भ्रष्टाचार अहवाल २०१७ - २३ फेब्रुवारी २०१८

* जागतिक भ्रष्ट्राचार आकलन निर्देशांकमध्ये भारताचे स्थान अवघ्या दोन स्तराने उंचावले असले तरी शेजारच्या चीनच्या तुलनेत हा देश याबाबत सुमार ठरला आहे.

* ११,४०० कोटी रुपयांचा पीएनबी-नीरव मोदी घोटाळा गाजत असतानाच 'ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल' चा २०१७ चा जागतिक भ्रष्ट्राचार निर्देशांक जाहीर झाला आहे.

* या निर्देशांकामध्ये भारताचे स्थान यापूर्वीच्या ७९ व्या स्थानावरून ८१ वर गेले आहे. विविध १८० देशामध्ये भ्रष्ट्राचाराबाबत भारताचे स्थान चीनपेक्षा सुमार तर पाकिस्तानपेक्षा बरे मानले गेले आहे.

* निर्देशांकाच्या मोजमापानुसार शून्य हे अति भ्रष्टाचाराचे तर १०० हे स्थान स्वच्छ व्यवस्थेचे मानले जाते. गुणाबाबत भारताचे स्थान मात्र ४० सह २०१६ मध्येही कायम राहिले आहे.

*आशिया पॅसिफिक भागातील काही देशामध्ये खुनासारख्या गुन्ह्यामध्ये चिंताजनक स्थिती असल्याचा उल्लेख याबाबतच्या अहवालात करण्यात आला आहे. याबाबत भारताला फिलिपाइन्स मालदीवपंक्तीत बसविण्यात आले आहे.

* भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करणारे पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते तसेच तपास यंत्रणेचे अधिकारी यांना जीव गमवावा लागल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

* आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचाराबाबत भारताची स्थिती चीनपेक्षाही सुमार राहिली आहे. पाकिस्तानपेक्षा मात्र बरी आहे. १८० देशामध्ये चीनचे स्थान ७७ तर पाकिस्तानचे स्थान ११७ वे आहे.

* आशियाई देशामध्ये भूतान देश चांगल्या स्थानावर आहे. तर बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, यांचे स्थान बिकट असल्याचे नमूद करण्यात आले आहेत.

* आंतराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलँड, डेन्मार्क, हे उत्तम तर सीरिया, दक्षिण सुदान, सोमालिया हे समोर गणले गेले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.