शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

'धनुष' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २४ फेब्रुवारी २०१८

'धनुष' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २४ फेब्रुवारी २०१८

* अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या धनुष या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीनजीक नौदलाच्या एका जहाजावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे.

* बंगालच्या उपसागरातील पारादरीपजवळील एका जहाजवरून सकाळी १०.५२ वाजता धनुष चाचणी घेण्यात आली. ५०० किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राने जमीन तसेच सागरातील लक्ष्याच्या अचूकपणे भेद केला.

* संरक्षण दलाच्या धोरणात्मक दल कमांडने ही चाचणी घेतल्याचे सांगितले. भारतीय नौदलाच्या एसएफसीच्या प्रशिक्षण सरावाचा हा एक भाग होता असे अधिकारी म्हणले.

* सिंगल स्टेज लिक्विड प्रोपेल्ड धनुष क्षेपणास्त्रांचा अगोदरच संरक्षण सेवेत समावेश करण्यात आलेला आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना अर्थात डीआरडीओ एकीकृत मार्गदर्शन क्षेपणास्त्र विकास प्रकल्पाअंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित केले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.