शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अटक - १७ फेब्रुवारी २०१८

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अटक - १७ फेब्रुवारी २०१८

* ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

* डी एस कुलकर्णी यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल. डीएसकेनी कोर्टाला फसवले असल्याचे शुक्रवारीच कोर्टाने म्हटले आहे.

* डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी वेळोवेळी उच्च न्यायालयाकडून मुदत घेतली होती. त्यामुळे गेले काही महिने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळत होते.

* एकवेळ भीक मागावी पण डीएसकेंनी लोकांचे पैसे उभारावे आणि याआधीच कोर्टाने म्हणत कारवाईसाठी तयार राहण्याचा इशाराच दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

* मी काहीही झाले तरीही लोकांचे पैसे बुडवणार नाही. क्राउड फंडिंगच्या माध्यमांतून पैसे उभे करेन अशी आश्वासने डी एस कुलकर्णी यांनी वारंवार दिली.

* मात्र ते कोर्टात पैसे भरण्यात अपयशी ठरले. तसेच त्यांनी दिलेली आश्वासनेही त्यांना पाळता आली नाही. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डी एस कुलकर्णी यांना शोधण्यासाठी पथके केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.