शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

भारतातील असमानता अहवाल २०१८ - २३ फेब्रुवारी २०१८

भारतातील असमानता अहवाल २०१८ - २३ फेब्रुवारी २०१८

* भारतातील श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत असल्याचे चित्र आहे. मागील ३ दशकातील सरकारच्या एकांगी धोरणाचा हा परिपाक आहे.

* देशातील अब्जाधीशांची संपत्ती मागील वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या जीडीपी १५ टक्के आहे. असे 'ऑक्सफॅम इंडिया' च्या या अहवालात म्हटले आहे.

* भारतातील असमानता अहवाल २०१८ हा अहवाल अलीकडेच सादर करण्यात आला आहे. यात देशातील श्रीमंतकाकडे असलेली संपत्ती ही प्रामुख्याने भांडवलशाही अथवा वारशाने आलेली आहे.

* याचवेळी तळातील नागरिकांच्या संपत्तीचे विभाजन होऊन ती आणखी कमी होत आहे. सरकाने १९९१ मध्ये राबविलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ही आर्थिक सुधारणांमुळे ही आर्थिक असमानता निर्माण झाली आहे.

* त्यानंतर सरकारने पुढील काळात राबविलेली धोरणे ही परिस्थिती आणखी बिघडण्यास कारणीभूत ठरली. भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती जीडीपी च्या १५% आहे.

* पाच वर्षांपूर्वी ती १०% होती. मागील वर्षात भारतात १०१ अब्जाधीश होते. आर्थिक असमानता असलेल्या देशामध्ये भारत आघाडीवर आहे. उत्पन्न, खर्च, संपत्ती, आणि सरकारचे धोरण या सर्व घटकामध्ये भारताची स्थिती अतिशय खराब आहे.

* सरकारचे धोरण हे कामगारापेक्षा भांडवलशाहीला महत्व देते. देशातील आर्थिक समानता १९८० मध्ये स्थिर होती. त्यानंतर १९९१ पर्यंत त्यात काही प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली.

* मात्र १९९१ पासून आर्थिक असमानतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यातील वाढ २०१७ पर्यंत कायम आहे. असे अहवालात नमूद करण्यात आले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.