गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

सायबर सुरक्षेच्या बाबतीत भारत सातव्या स्थानावर - २२ फेब्रवारी २०१८

सायबर सुरक्षेच्या बाबतीत भारत सातव्या स्थानावर - २२ फेब्रवारी २०१८

* आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सायबर सुरक्षा हे खूप महत्वाचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. ज्याप्रमाणात अनेक गोष्टीची डिजिटायझेशन होत आहे त्याप्रमाणात सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

* महत्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशाने अनेक हॅकर्स डेटा चोरी करतात. याच सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील टेक्नॉलॉजी या कंपनीने नुकतेच एक सर्वेक्षण केले.

* या सर्वेक्षणातील अहवालानुसार सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावर आहे. अकमै टेक्नोलॉजी नुकताच जाहीर केलेल्या 'स्टेट ऑफ द इंटरनेट' अहवालामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील अकमै टेक्नोलॉजी या कंपनीचे आकडेवारी जाहीर केली.

* आणि सर्वाधीक चिंतेची बाब म्हणजे ही वाढ आर्थिक व्यवहारसंदर्भात सेवांशी संबंधीत वेबसाईट्स आणि अप्लिकेशनवर झाले आहेत.

* मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यापैकी ४०% म्हणजेच ५३ हजाराहून अधिक सायबर हल्ले हे आर्थिक क्षेत्रासंबंधीत वेबसाईट्स आणि ऍप्लिकेशनवर झाले आहेत.

* रॅम्सवेअर, क्रिप्टो मायनींग सारख्या माध्यमातून डिजिटल माध्यमातील संपत्तीवर हॅकर्स डल्ला मारतात अशा चोरीमुळे त्यांना चोरलेले पैसे थेट त्यांच्या क्रिप्टोवॉलेटमध्ये साठवता येत नाही.

* अशा चोरीमुळे त्यांना चोरलेले पैसे त्यांच्या क्रिप्टोवॉलेटमध्ये साठवता येतात म्हणजे त्यांच्या डिजिटल खात्यावर जमा करता येतात असे मॅके म्हणाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.