शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचा राजीनामा - १६ फेब्रुवारी २०१८

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचा राजीनामा - १६ फेब्रुवारी २०१८

* अनेक घोटाळ्यांनी प्रतिमा कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

* देशवासियांना उद्देशून टीव्हीवर केलेल्या भाषणात झुमा यांनी पदत्यागाची घोषणा केल्याने आफ्रिका खंडातील या सर्वाधिक विकसीत देशातील राजकीय अस्थिरता संपली.

* त्यांच्यानंतर लगेचच सिरील रामपोसा नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने एनएससी झुमा यांना पद सोडण्याचे आदेश दिले होते.

* त्यानंतर झुमा यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत आपण पदत्याग करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. विरोधी पक्षांनी झुमा यांच्याविरुद्ध संसदेत मांडलेला अविश्वास ठराव गुरुवारी चर्चा व मतदानासाठी येणार होता.

* झुमा स्वतःहून पदावरून दूर झाले नाहीत तर या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून त्यांची हकालपट्टी करण्याचे संकेत एनएससी ने दिले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.