शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

नरेंद्र मोदींना पॅलेस्टाईनचा मानाचा ग्रँड कॉलर सन्मान - १० फेब्रुवारी २०१८

नरेंद्र मोदींना पॅलेस्टाईनचा मानाचा ग्रँड कॉलर सन्मान - १० फेब्रुवारी २०१८

* भारत आणि पॅलेस्टाईन परस्पर चांगले राजकीय संबंध राखण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाईन राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या हस्ते 'ग्रँड कॉलर ऑफ दि स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' या सन्मानाने शनिवारी गौरविण्यात आले.

* पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या राजांना, देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखांना तसेच त्यांच्या समकक्ष पद भूषविणाऱ्या परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅलेस्टाईन राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान मोदींना या सन्मानाने गौरविण्यात आले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. ज्यांनी पॅलेस्टाईनला अधिकृत भेट दिली. यापूर्वी पॅलेस्टाईन कडून सौदी अरेबियाचे राजे सलमान, बहरीनचे राजे हमद, चीनचे राष्ट्राध्यक्ष  शी जिनपिंग यासारख्या राष्ट्रप्रमुखाना 'ग्रँड कॉलर' या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.