मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

अग्नी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २१ फेब्रुवारी २०१८

अग्नी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २१ फेब्रुवारी २०१८

* भारतानं आज अग्नी २ अणवस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मंगळवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली आहे.

* इंटीग्रेटेट टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स ४ मधून मोबाईल लॉन्चरच्या माध्यमातून अग्नी २ ची चाचणी घेण्यात आली. अग्नी २ क्षेपणास्त्र २० मीटर लांबीचे असून त्याचे वजन १७ टन आहे.

* तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी २ चा माऱ्याचा पल्ला २ हजार किमी इतका आहे. भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलोपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओन विकसित केलेल्या अग्नी या सिरींजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे.

* या सिरीजमध्ये अग्नी १ - ७०० किमीचा पल्ला, अग्नी ३ - ३००० किमीचा पल्ला, अग्नी ४ - ४००० किमीचा पल्ला व अग्नी ५ - ५००० किमीचा पल्ला यांचा समावेश आहे.

* हे क्षेपणास्त्र याआधीच लष्करामध्ये सामील झाले असून अत्यंत आधुनिक अशा यंत्रणेण सज्ज आहे. पंधराच दिवसापूर्वी भारतानं पृथ्वी २ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्यात आता अग्नी २ ची भर पडली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.