शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

'ब्रेनड्रेन' रोखण्यासाठी केंद्राची महाशिष्यवृत्ती योजना - १० फेब्रुवारी २०१८

'ब्रेनड्रेन' रोखण्यासाठी केंद्राची महाशिष्यवृत्ती योजना - १० फेब्रुवारी २०१८

* भारतातल्या हुशार विद्यार्थ्यांना संशोधनासाठी परदेशी जाण्यापासून रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने तब्बल ८० हजार रुपये मासिक शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.

* केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 'पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती' [PMRF] अशी ही योजना आहे.

* आयआयटी, आयसर, एनआयटी सारख्या संस्थांमधील उच्च शिक्षणातल्या संशोधनासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असून आतापर्यंतची ही देशातली सर्वात मोठी शिष्यवृत्ती आहे.

* पीएमआरएफअंतर्गत निवडलेल्या स्कॉलर्सना ७० हजार रुपयापासून ८० हजार रुपयांपर्यंत मासिक शिष्यवृत्ती आणि २ लाख रुपयांपर्यंत वार्षिक संशोधन अनुदान दिले जाईल.

* तीन वर्षासाठी १,६५० कोटी रुपयांच्या निधीची या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. ज्या इंजिनिअरिंग पदवीधरांना पुढे संशोधन करायचे आहे. त्यांना आणखी एक लाभ मिळणार आहे.

* पीएमआरएफसाठी अंतिम यादीत नाव आलेले बीटेक आयआयटी, आयसर आणि एनआयटीचे बीटेक ग्रॅज्युएट्स आयआयटी किंवा आयआयसी बेंगळुरू येथून थेट पीएचडी करू शकणार आहेत.

* या योजनेअंतर्गत दरवर्षी १,००० शिष्यवृत्ती देण्यात येतील. याव्यतिरिक्त आयआयटी आणि आयआयएससीमध्ये रिसर्चशी संबंधित सुविधा अद्ययावत करण्याकडे देखील सरकार लक्ष देत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.