रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

केंद्राकडून महाराष्ट्राला ४३ हजार कोटी निधी - ४ फेब्रुवारी २०१८

केंद्राकडून महाराष्ट्राला ४३ हजार कोटी निधी - ४ फेब्रुवारी २०१८

* वेगवेगळ्या करापोटी केंद्राकडून जमा होणाऱ्या महसुलातून महाराष्ट्राला नव्या आर्थिक वर्षात [२०१८-१९] ४३,५०० कोटी रुपये मिळणार आहेत. अर्थातच लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक निधी मिळविणाऱ्या राज्यामध्ये उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यांचा समावेश आहे.

* नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार कंपनीकर प्राप्तिकर, सीजीएसटी [राज्य जीएसटी] आयजीएसटी [एकात्मिक जीएसटी] सीमाशुल्क केंद्रीय उत्पादन शुल्कातून जमा होणाऱ्या महसुलापैकी ७,८८,०९२.५२ कोटी रुपये केंद्राच्या खजिन्यातून राज्यांना मिळणार आहे.

* केंद्राकडून सर्वाधिक निधी उत्तरप्रदेश १,४१,५३९ कोटी, बिहारला ७६,१७२.३७ कोटी, पश्चिम बंगाल ५७,७२२ कोटी, महाराष्ट्र ४३,५१४ कोटी, राजस्थान ४३,३०९ कोटी एवढा निधी मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.