गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ५ वर्षाची सक्तमजुरी - ९ फेब्रुवारी २०१८

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ५ वर्षाची सक्तमजुरी - ९ फेब्रुवारी २०१८

* बांगलादेश माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी [बीएनपी] च्या नेत्या खालिदा झिया [वय ७२] यांना न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवत गुरुवारी ५ वर्षाची सक्तमजुरी शिक्षा सुनावली.

* या प्रकरणात खालिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रेहमान आणि अन्य चौघांना दोषी ठरवत १०-१० वर्षांनी शिक्षा सुनावली.

* खालिदा झिया आणि त्यांचे चिरंजीव बिएनपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तारिक रेहमान यांच्यासह पाच जणांविरुद्ध सुमारे अडीच लाख डॉलरचा गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता.

* या खटल्याची सुनावणी ढाका न्यायालयात झाली. या शिक्षेमुळे झिया आता बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होऊ शकणार नाहीत.

* २००८ मध्ये भ्रष्टाचारविरोधी आयोगाने झिया आणि त्यांचा मुलगा तारिक रेहमानसह सहा जणांविरुद्ध जिल्हा अनाथाश्रम न्यास गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

* न्यास निधीत कोट्यवधी बांग्लादेशी टकाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.