सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

चांद्रयान १ मोहिमेचे निष्कर्ष - २६ फेब्रुवारी २०१८

चांद्रयान १ मोहिमेचे निष्कर्ष - २६ फेब्रुवारी २०१८

* चंद्राच्या जवळपास संपूर्ण पृष्ठभागातच पाणी उपलब्द असून एका ठराविक भागात पाण्याचे साठे एकवटलेले नसल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

* भारताच्या चांद्रयान - १ वरील नासाच्या उपकरणाद्वारे मिळालेल्या माहितीवरून संशोधकांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

* चंद्रावरील पाण्याचा उगम आणि त्याचा संसाधन म्हणून सजहजतेने वापर कसा केला जाऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी या संशोधनासाची मदत होऊ शकते. असे अमेरिकेतील स्पेस सायन्स इन्स्टिट्यूटमधील संशोधक जोशुआ बँडफिल्ड म्हणाले.

* जर चंद्रावर पुरेसे पाणी असेल आणि ते मिळविणे किफायतशीर असेल तर भविष्यात संशोधकाकडून याचा वापर पिण्यासाठी तसेच हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळे करून रॉकेटचे इंधन तसेच श्वसनासाठी ऑक्सिजनच्या स्वरूपातही केला जाऊ शकतो.

* येथे पाणी नेहमी अस्तित्वात असल्याचे संकेत सिग्नलवरून मिळाल्याचे जोशुआ म्हणाले. पृष्ठभागाच्या रचनेवर पाण्याचे अस्तित्व अवलंबून नसून ते चोहीकडे असल्याचेही ते म्हणाले.

* चंद्राच्या ध्रुवीय बाजूकडे जास्त पाणी असल्याच्या अगोदरच्या अभ्यासकांना यामुळे धक्का बसला आहे. नेचर या जिओसायन्स या नियतकालिकात हे संशोधन विस्तृतपणे प्रकाशित झाले आहे. भारताच्या चांद्रयान १ चे २२ ऑकटोबर २००८ रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.