शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

श्याम बेनेगल यांना व्ही शांताराम जीवगौरव पुरस्कार जाहीर - ३ फेब्रुवारी २०१८

श्याम बेनेगल यांना व्ही शांताराम जीवगौरव पुरस्कार जाहीर - ३ फेब्रुवारी २०१८

* प्रसिद्ध सिनेदर्शक श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बेनेगल यांना मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव २०१८ च्या सांगता समारंभात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. 

* यावेळी त्यांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि १० लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. २००५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. त्याशिवाय त्यांना पदमभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आले आहे. 

* व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने श्याम बेनेगल यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. 

* या समितीत किरण शांताराम, राहुल रावल प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांचा सहभाग होता.

* बेनेगल यांना आतापर्यंत त्यांच्या सिनेमासाठी यांना त्यांच्या 'आरोहन' [१९८२] या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

* बेनेगल यांना आतापर्यंत त्यांच्या सिनेमासाठी आणि माहितीपटासाठी नऊवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

* श्याम बेनेगल यांनी २८ सिनेमांचे दिग्दर्शन केले. यात अंकुर, निशांत, मंडी, भूमिका, मंथन आणि जुनूनसारख्या सिनेमाचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.