सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

राष्ट्रीय चालण्याच्या स्पर्धेत सौम्याला सुवर्णपदक - १९ फेब्रुवारी २०१८

राष्ट्रीय चालण्याच्या स्पर्धेत सौम्याला सुवर्णपदक - १९ फेब्रुवारी २०१८

* सौम्या बी हिने राष्ट्रीय चालण्याच्या स्पर्धेतील वीस किमी शर्यतीत राष्ट्रीय विक्रम करताना आपली सर्वोत्तम कामगिरी तब्बल दहा मिनिटांनी उंचावली.

* सौम्याने अखेरच्या फेरीत वेग कमालीचा वाढवताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद असलेल्या खुशबीर कौर हिला मागे टाकले.

* मूळची केरळची पण आता सीआरपीएफ नवी दिल्लीत असलेली सौम्या अखेरचे एक किलोमीटर असतानाही मागे होती. पण तिने अखेर हे अंतर एक तास ३१ मिनिटे २८.७२ सेकंदात पूर्ण केले.

* तिने चार वर्षांपूर्वी खुशबीरने केलेला राष्ट्रीय विक्रम [एक तास ३१.४० मिनिटाचा विक्रम मोडला. खुशबीरने या वीस फेऱ्यांच्या शर्यतीत १९ फेऱ्याअखेर आघाडी घेतली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.