मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

नीट २०१८ परीक्षेसाठी महाराष्ट्रात ६ नव्या केंद्रांना मान्यता - २८ फेब्रुवारी २०१८

नीट २०१८ परीक्षेसाठी महाराष्ट्रात ६ नव्या केंद्रांना मान्यता - २८ फेब्रुवारी २०१८

* नीट २०१८ परीक्षेसाठी यंदा ४३ नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. पहिल्यांदाच नीट परीक्षा एकूण दीडशे शहरामध्ये पार पडणार. यामध्ये महाराष्ट्रातील ६ नव्या केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

* आतापर्यंत देशातील १०७ सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे. यावेळी महाराष्ट्रातील सहा केंद्रासह ४३ केंद्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, लातूर, आणि सोलापूर या केंद्रांचा समावेश करण्यात आला.

* नीटसाठी याअगोदर राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, सातारा ही केंद्रे होती. त्यामुळे महाराष्ट्रातील नीट परीक्षा केंद्राची संख्या १६ झाली आहे.

* सुरवातीला नीट परीक्षा राज्यात फक्त सहाच केंद्रावर घेण्यात येत होती. विद्यार्थ्यांची ओरड केल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात ४ केंद्र वाढविण्यात आले. मराठवाड्यातील फक्त औरंगाबाद हे एकच केंद्र असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. आता बीड आणि लातूरची भर त्यात पडली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.