बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २ मार्च २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २ मार्च २०१८

* बँकांमधील वाढती घोटाळ्याची प्रकरणे आणि बुडीत कर्जाच्या वर्गवारी करण्याबाबत बँकांमधील विविध पळवाटा वापरण्याची पद्धती याची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका तज्ञ समितीच्या स्थापनेची घोषणा केली.

* पाकिस्तानमध्ये कृष्णा लाल कोहली यांना सिनेटसाठी पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाची [सिनेट] निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत.

* कोळसा खाणी खासगी क्षेत्राला व्यवसायिक वापरासाठी खुल्या करण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. १९७३ साली कोळसा खाणीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्यात येत आहेत.

* नीती आयोगाचे आरोग्य संचालक डॉ दिनेश अरोरा यांची नुकतीच 'आयुष्यमान भारत' या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

* सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्या देशात नागरिकांना त्यांच्या करपात्र उत्पन्नानुसार १०० ते ३०० सिंगापूर डॉलर बोनस देण्यात येईल.

* प्रसिद्ध गणितज्ञ ब्लादिनीर गेरशोनोविच ड्रिनफेल्ड यांना गणितातील प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार मिळाला आहे.

* अरुण जे सन्याल आणि पार्थिक नायडू या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

* कर्नाटकमध्ये पहिलीपासून कन्नड सक्तीचा विषय असल्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठी सक्ती कधी होणार हा विषय ऐरणीवर आला आहे.

* आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी अनिवार्य असे महत्वाचे कागदपत्र आहे. बँक खाते, आर्थिक व्यवहार आणि इतर अनेक महत्वाच्या व्यवहारासाठी व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक असते. हे आधारकार्ड आता लहानग्यांसाठी अनिवार्य असणार आहे.

* आयसीसी कसोटी क्रमवारीतील सांघिक यादीमध्ये अव्वल स्थान गाठल्याबद्दल प्रतिष्टेची कसोटी अजिंक्यपदासाठी गदा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. यासह भारतीय संघाला १० लाख अमेरिकन डॉलरचे इनाम देण्यात आले.

* चंद्रावर पुढील वर्षापर्यंत ४ जी नेटवर्क सुरु करण्यात येणार आहे. असे व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने म्हटले आहे.

* युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आता बाल आधार कार्ड लॉन्च केले आहे. ५ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळ्या रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे.

* जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकिपीडियाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खंडेरायाची जेजुरीच्या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत जेजुरी गडावर भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो २०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो ठरला आहे.

* राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या पारुपल्ली कश्यपने आस्ट्रेलियन खुल्या आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकाविले.

* भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते शास्त्रज्ञ आणि स्टॅनफर्ड मानद प्राध्यापक रिचर्ड एडवर्ड टेलर यांचे २२ फेब्रुवारी निधन झाले.

* केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना सहजासहजी प्रोव्हिडंट फंड अर्थात जीपीएफ काढता येणार आहे.

* अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकाचे पावसाळ्यापूर्वी सुरू होणार असून. या शिवस्मारकाचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतील एल अँड टी कंपनीला देण्यात आले. हे काम ३ वर्षात पूर्ण होणार असून यासाठी अडीच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.