सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

काही नवीन विशेष चालू घडामोडी - २५ फेब्रुवारी २०१८

काही नवीन विशेष चालू घडामोडी - २५ फेब्रुवारी २०१८

* ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ प्रतिष्ठेचे अॅलन बॉर्डर पदक जिंकले. त्याने दुसऱ्यांदा या पदकावर नाव नोंदले.

* केरळच्या थिरुअनंतपुरममध्ये १७-२१ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत 'राष्ट्रीय केळी महोत्सव' २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरात घेतल्या जाणाऱ्या केळीच्या उत्पादनामध्ये भारताचा २५.५८ एवढा वाटा आहे.

* राष्टकुल संसदीय संघटना [CPA] च्या भारत क्षेत्राची सहावी परिषद बिहारच्या पाटणा शहरात आयोजित करण्यात आली आहे.

* पुरातत्वशास्त्रज्ञ अरविंद पी. जामखेडकर हे भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद [ICHR] चे पुढील अध्यक्ष असणार आहे.

* स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वर्षाचा पहिला ग्रँड स्लॅम 'ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यावर ATP जागतिक क्रमवारीत क्रमांक १ चा खेळाडू बनला आहे.

* दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती सायरिल रामाफोसा यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे.

* केंद्राने शासनाने देशात २५ वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. संस्थेच्या स्थापनेपासून केंद्राकडून प्रत्येकी २५० कोटी रुपयाची तरतूद मान्य करण्यात आली.

* रोटोमॅक पेन्सचे उत्पादन करणाऱ्या रोटोमॅक ग्लोबल प्रा लि या कंपनीचे प्रमुख विक्रम कोठारी यांनी ७ सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ३,७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली असल्याचे उघड झाले आहे.

* दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या २८ दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या ६ लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

* भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून इस्रो चांद्रयान-२ भारताच्या महत्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, अशी माहिती अंतराळ विभागाचे राज्यमंत्री जिंतेन्द्र सिंग यांनी दिली आहे. 

* अरुण जे सन्याल आणि पार्थिक नायडू या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

* महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी बडोदे गुजरात येथे १६ फेब्रुवारी रोजी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उदघाटन झाले. डॉ रघुवीर चौधरी हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

* राजधानी दिल्लीमध्ये १७ फेब्रुवारीपासून थिएटर ऑलिम्पिकसचे सामने सुरु होत असून भारतात प्रथमच थिएटर ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवित आहे.

* शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घेण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात येत आहे. त्यानंतर आता रेशन दुकानात मिळणाऱ्या स्वस्त धान्यासाठी यापुढे आधारकार्ड अनिवार्य केले जाणार आहे.

* अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम आणखी कडक केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने या व्हिसा धोरणामध्ये केलेल्या नव्या बदलांचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय व इतर देशातील नागरिकांना होणार आहे.

* हैद्राबादमध्ये १९ फेब्रुवारी २०१८ रोजी 'जागतिक माहिती तंत्रज्ञान परिषद २०१८' चा शुभारंभ करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.