शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १५ फेब्रुवारी २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १५ फेब्रुवारी २०१८

* केंद्रीय मंत्रिमंडळाने 'प्रधानमंत्री संशोधन शास्त्री योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी वर्ष २०१८ -१९ पासून ७ वर्षाच्या कालावधीसाठी १६५० कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली आहे.

* केंद्रीय मंत्रिमंडळाने पारा [धातूपदार्थ] संदर्भात असलेल्या 'मिनीमाटा करार' याच्या प्रमाणीकरणास मान्यता दिली आहे. या कराच्या प्रमाणीकरणांनंतर भारत कराराचा भाग बनणार आहे.

* कर्नाटक राज्य शासनाने [मुख्यमंत्री अनिल भाग्य योजना] [MMABY] दारिद्र रेषेखालील कुटुंबाना मोफत LPG जोडणी देण्याकरिता सुरु करण्यात येत आहे.

* हैद्राबादमधील नेकनामपूर तलावात भारतातला सर्वात मोठा तरंगता बेट तयार करण्यात आला आहे. इंडिया बुक ऑफ रिकॉर्डसने याला देशातील सर्वात मोठे फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलँड [FTW] म्हणून मान्यता दिली आहे.

* मह्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिळवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने [इस्रो] अजून एका महत्वाकांशी मोहिमेच्या तयारीत आहे.

* भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या पलटणापैकी एक अशी 'मराठा लाईट इन्फ्रंट्री' ला ४ फेब्रुवारी २०१८ रोजी २५० वर्षे पूर्ण झालेली आहेत.

* सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही २० जानेवारी रोजी २४ तासात ९८० विमानांची येजा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी याच विमानतळावर २४ तासामध्ये ९७४ विमानांची येजा झाली होती.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'Exam Warriors' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे 'पेंग्विन पब्लिशर' हे प्रकाशक आहेत. हे पुस्तक विद्यार्थ्यांना समर्पित आहे. जे परीक्षेदरम्यान चिंता व तणावाचा सामना करतात.

* मागही भाषा आणि साहित्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्या कारणाने वर्ष २०१६ साठीचा साहित्य अकादमीचा प्रतिष्टीत भाषा सन्मान शेष आनंद मधुकर यांना प्रदान केला गेला आहे.

* भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आतापर्यंत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हागणदारी मुक्त [ODF] जाहीर करण्यात आले.

* या ११ मध्ये सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, चंदीगड, दमण-दीव, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, आणि मेघालय यांचा समावेश आहे.

* खेलो इंडिया शालेय खेळामध्ये हरियाणा राज्यातील खेळाडूनी ३८ सुवर्णपदकासह एकूण १०२ पदके जिंकून पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे.

* एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेसासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी घेणार आहेत.

* स्पेसएक्स उद्योग सम्राट एलॉन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' या कंपनीने 'फाल्कन हेवी' हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले.

* केंद्र सरकारने नीलम कपूर यांची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या [साई] महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. १९८२ च्या तुकडीतील भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असलेल्या कपूर याआधी क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयच्या मुख्याधिकारी होत्या.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसाच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा पंतप्रधान मोदी यांचा हा पाचवा दौरा आहे.

* केरळचे प्रसिद्ध कथकली नर्तक मदावूर वासुदेवन नायर यांचे आंचल येथील अगस्त्यकोड महादेव मंदिरात कथकली नृत्य सादर करीत असताना ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले.

* भारतीय वंशाच्या कल्पक वैज्ञानिक सुमिता मित्रा यांचा अमेरिकेत 'यूएस नॅशनल इन्वेस्टर्स हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

* संरक्षण मंत्रालयाने ७.४० लाख असॉल्ट रायफल्स खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत.

* तेहरीक-ई-तालिबान पाकिस्तान [टीटीपी] या संघटनेच्या उपप्रमुख खालिद मेहसूद उर्फ सजना ८ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या ईशान्येकडील आदिवासी भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याच्या वृत्ताला या संघटनेने दुजोरा दिली.

* ११ ते १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सहावी 'जागतिक सरकार शिखर परिषद [WGS] दुबई [संयुक्त अरब अमिराती] मध्ये संपन्न झाली. भारत यावर्षी या कार्यक्रमाचा अतिथी देश होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन केले गेले होते.

* संयुक्त अरब अमिराती [UAE] ची राजधानी दुबईत जगातील सर्वाधिक उंच [हॉटेल गेवेरा] १२ फेब्रुवारी २०१८ पासून ग्राहकांसाठी खुले झाले आहे.

*
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.