शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना [एनएचपीएस] ची वैशिट्ये - १० फेब्रुवारी २०१८

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना [एनएचपीएस ] ची वैशिट्ये - १० फेब्रुवारी २०१८

* यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये १० कोटी कुटुंबासाठी जाहीर करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय अयोग्य संरक्षण योजनेसाठी [ NHPS -National Helath Protection Scheme] राज्य सरकारना दरवर्षी जवळपास ४३३० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याचे सरकारने याबाबत केलेल्या प्राथमिक हिशोबातून समोर आले आहे.

* प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आरोग्य कवचासाठी दरवर्षी दर कुटुंबासाठी १०८२ रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे. त्यापैकी ४३३ रुपये दरवर्षी राज्याचा वाटा असेल तर उर्वरित रक्कम केंद्र सरकारला प्रीमियम म्हणून भरावी लागणार आहे.

* एकाच वेळी १० कोटी कुटुंबाना याचा लाभ होणार आहे. यावर ही आकडेवारी आधारित आहे. एकाच वेळी १० कोटी कुटुंबाना याचा लाभ होणार आहे यावर ही आकडेवारी आधारित आहे. असे सूत्रांनी सांगितले.

* या सर्व बाबीचा विचार करता राज्यावर १० कोटी कुटुंबासाठी ४३३० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाने राज्याशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

* यासंदर्भात इमेल पाठविण्यात आले असून प्रत्येक राज्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क सुरु करण्यात आला आहे.

* एनएचपीसी आकडेवारी राज्य आणि केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य संरक्षण योजनांवर आधारित आहे. राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या जवळपास ३.८ कोटी इतकी असून त्यासाठी सरकार ५०० रुपये प्रतिकुटुंब प्रीमियम भरत आहे.

* सदर विमा योजना मुख्यत्वे दारिद्र्य रेषेखालील विशेषतः स्थलांतरित कामगारांसाठी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.