सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन मध्ये पहिल्याच दिवशी ७०,३२५ कोटीचे प्रस्ताव - १९ फेब्रुवारी २०१८

मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन मध्ये पहिल्याच दिवशी ७०,३२५ कोटीचे प्रस्ताव - १९ फेब्रुवारी २०१८

* कालपासुन मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेची सुरुवात झाली असून त्यात  मध्ये पहिल्याच दिवशी ७०,३२५ कोटीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे.

* रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेशी अंबानी यांच्या तर्फे ६० हजार कोटीची गुंतवणूक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, ब्लॉकचेन या आधारे डिजिटल क्रांती घडवून आणण्यास रिलायन्स पहिले डिजिटल इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल क्षेत्र महाराष्ट्रात उभे करणार आहे.

* सिस्को, डेल, एचपी, नोकिया यासारख्या २० कंपन्या भागीदारी करण्यास तयार आहेत. ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे केली जाईल.

* भारतात १३ लाख रोजगार उभारण्यास कटिबद्ध असू असे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अव्वल साब या स्वीडिश कंपनीचे जॉन विंडरस्टॉर्म म्हणाले.

* महाराष्ट्रात ८ हजार कोटी रुपयाचा पोलाद कारखान्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यातून २ हजार लोकांना थेट रोजगार उपलब्द होईल.

* महिंद्रा उद्योग समूह कांदिवलीत १,७०० कोटी रुपयाची विशेष सुविधा उभी करणार आहे.

* संरक्षण क्षेत्र सामग्री उत्पादनात कार्यरत असलेल्या भारत फोर्जचे बाबा कल्यानी यांनी खेड येथे हायब्रीड व ई-वाहनांच्या सुट्या भागांचे २ कारखाने सुरू करण्याची घोषणा केली.

* भारताची सध्या असलेली २.३० लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था ५ लाख डॉलरपर्यंत नेताना, महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. असे इमर्सन एडवर्ड मॉन्सन म्हणाले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण ई-वाहनांची लक्ष्य निश्चित केले आहे. केंद्रानंतर महाराष्ट्राने या संबंधीचे पहिले धोरण तयार केले. यामुळेच महिंद्रा कंपनी ५०० कोटी रुपयांचा ई-वाहन कारखाना उभा करेल. यासंबंधी नागपूर १२५ कोटी रुपये खर्चून सेंटर ऑफ एक्सलन्स उभे केले जाईल.

* पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या २० मिनिटात शक्य करू शकणारी हायपरलुप ट्रेन करत आहोत. देशातील प्रमुख शहरांना २ तासात जोडणारी आणि दरवर्षी १५ कोटी प्रवाशांना नेआण करण्याची क्षमता असलेली ट्रेन सुरु करण्यास आम्ही कटिबद्ध आहे. अशी ग्वाही व्हर्जिन हायपरलूपचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनी दिली.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.