शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

राज्यातील पहिले मेगा फूड पार्क साताऱ्यात १ मार्च सुरु होणार - २४ फेब्रुवारी २०१८

राज्यातील पहिले मेगा फूड पार्क साताऱ्यात १ मार्च सुरु होणार - २४ फेब्रुवारी २०१८

* शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, लघू, मध्यम उद्योजकांच्या उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्द व्हावी यासाठी सातारा येथील देगाव येथे 'सातारा मेगा फूड पार्क' उभारण्यात आले आहे.

* एकूण ७० एकर परिसरात उभ्या राहिलेल्या पार्कमध्ये कोल्ड स्टोरेजसह रॉ मटेरियल स्टोरेज, प्लपिंग लाईन, पॅकेजिंग लाईन, एटीपी, डब्लूटीपी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सुएज ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आले आहे.

* छोट्या उद्योजकांचा या सुविधांचा लाभ घेता येणार असून, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क आहे. भारत विकास ग्रुपने [बीव्हीजी] या प्रकल्पाला चालना दिली आहे.

* १ मार्च रोजी दुपारी अडीचला फूड पार्कचे उदघाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

* या पार्कमध्ये बीव्हीजीच्या १० व अन्य ३ असे एकूण १३ कारखाने सुरु करण्यात येणार आहेत. मिनरल वॉटर, जॅम, सॉस, हळद, डाळिंब, प्रक्रिया उद्योग, जिंजर ऑइल, पशुखाद्य सोनचाफ्याच्या फुलावर प्रक्रिया, जांभूळ प्रक्रिया अशा शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यात येणार आहे.

* अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्द आहेत. उद्योजकांना भाडे तत्वावर जागा देण्यात येईल. तसेच उद्योगासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. याचा सर्वाधिक फायदा सातारा आणि आजूबाजूच्या लोकांना होईल.

* राज्य सरकारने या प्रकल्पाला म्हणून घोषित केले असून, जीएसटी मधून सूट मिळणार आहे. चार ठिकाणी प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर सुरु करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.