मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

मालदीवमध्ये आणीबाणी लागू - ६ फेब्रुवारी २०१८

मालदीवमध्ये आणीबाणी लागू - ६ फेब्रुवारी २०१८

* मालदीवचे अध्यक्ष अब्दूल्ला यमीन यांनी आज देशात पंधरा दिवसांनी आणीबाणी जाहीर केली. अध्यक्षांचे सहकारी अझिमा शुकूर यांनी सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवरून आज आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली.

* यामुळे मालदीवमधील राजकीय पेचप्रसंग आणखी गंभीर झाला आहे. आणीबाणीमुळे लष्कराला अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत.

* राजकीय कैद्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यास अध्यक्ष यमीन यांनी नकार दिल्याने मालदीवमध्ये सध्या राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्याचे पर्यवसन आज आणीबाणीत झाले.

* मालदीव येथील सर्वोच्च न्यायालयाने तेथे लोकशाही पद्धतीने बनलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद दहशतविरोधी खटला चालविण्याचा निर्णय दिला.

* या निर्णयानंतर मालदीव लोकशाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. या पोलिसांनी झटपट झाल्याने काही ठिकाणी दंगलीचे स्वरूप आले होते.

* न्यायालयाचा आदेश पाळण्याबाबत जागतिक स्तरावरून दबाव येऊनही यमिन आपल्या निर्णयावर ठाम राहिले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.